We have been involved in content writing, spoken English training, translation, teaching academic English, motivational quotes and guidance for the last 16years. We intend to reach global audience through this platform and provide our services without any charges. We are all set to provide it with different edge.we expect your support.Thanks.

ध्येय यामागील ध्येय (purpose of purpose)
छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत जन्माला येऊन आपण सर्व धन्य झालो आहोत. आपल्या महाराष्ट्राला अनेक महान योद्धे, संत, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक व इतरही अनेक महान व्यक्तिमत्त्वांचा वारसा लाभलेला आहे. आधुनिक काळात मराठी माणसांच्या यशाची कमान चढती ठेवणे हे आपणा सर्वांचे ध्येय आहे. याच ध्येयाची पूर्तता करण्यासाठी आम्ही आमचे ध्येय universal Marathi.com ही वेबसाइट तयार केली आहे.
महान कवी Alfred lord Tennyson यांच्या Ulysses या सुप्रसिद्ध कवितेमधील ओळी To strive, To seek, To find And not to yield आपण सर्व जाणताच. याच ओळी मला बालपणापासून प्रेरित करत आलेल्या आहेत. त्यांचा अर्थ असा आहे की झगडत राहा, झुंजत राहा, प्रयत्न करत राहा परंतु हार मानू नका. या ओळीतील अर्थाला अनुसरूनच माझा व आपल्यासारख्या कित्येक लोकांचा जीवन प्रवास चालू आहे. आपण अनेक कार्ये हाती घेतो मात्र ती तडीस नेण्यात अनेकदा आपण कमी पडतो .हीच कमतरता भरून काढण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते देण्याचा आमचा प्रयत्न सदैव राहील. जगप्रसिद्ध APPLE कंपनीचे संस्थापक स्टीव जॉब्स यांनी आपल्या एका प्रसिद्ध भाषणात संदेश दिला आहे STAY HUNGRY-STAY FOOLISH म्हणजेच सतत नवनवीन गोष्टी शिकत रहा परंतु कधी असे समजू नका की आपण सर्व काही जाणतो.
आधुनिक काळात यशस्वी होण्यासाठी व सतत अग्रेसर राहण्यासाठी spoken English, grammar, vocabulary, writing skills, motivation,creativity, how to learn to learn यासारख्या संकल्पना प्रभावीपणे आत्मसात करणे आवश्यक आहे. मला व आपणा सर्वांनाच आपली मातृभाषा मराठीचा सार्थ अभिमान आहे व सदैव राहील. मात्र इंग्लिश जागतिक दळणवळणाची भाषा आहे. जगावर आपला ठसा उमटवून आपल्या भारताला महासत्ता बनविण्यासाठी ती शिकणे गरजेचे आहे .आपला भारत देश हा जगापुढे एक आदर्श आहे व त्याची अधिकाधिक प्रगती व भरभराट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. म्हणूनच आम्ही सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने कशा आत्मसात करता येतील याची माहिती देण्यासाठी हा खटाटोप केलेला आहे. आपणा सर्वांचे प्रेम, सहकार्य व आशीर्वाद आम्हाला आमच्या उद्दिष्टांमध्ये यशस्वी बनवतील. हा एक मोठा प्रवास आहे यातील काही टप्पे आपण गाठले आहेत परंतु अजून खूप गोष्टी करणे बाकी आहे. हे जग सुंदर व सुखी बनविण्यासाठी आम्ही आमच्या परीने सदैव प्रयत्नरत राहू अर्थात आपला सहभाग गृहीत धरूनच. याठिकाणी महान इंग्लिश कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या Stopping By The Wooods On A Snowy Evening या कवितेतील ओळी आठवतात
Woods are lovely dark and deep,
But I have promises to keep
And miles to go before I sleep.
एका विलक्षण आनंददायी प्रवासाची ही आहे सुरुवात
आत्यंतिक आदर व आपलेपणाने आपणा सर्वांना उज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा
from team -universalmarathi.com
Januya Hatke…
Do contact us [email protected]
