संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

महाराष्ट्र चळवळ

महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. ही चळवळ जोरात सुरू असतानाच एक घटना घडली. या घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 

संयुक्त महाराष्ट्र चळवळ
भारत सरकारने भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अनुसरुन मराठी बहुल नागरिकांसाठी महाराष्ट्र या राज्याची स्थापना करण्याची मागणी पुढे आली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा या मागणीला विरोध होता. राज्यकर्त्यांचा हा विरोध पाहून नागरिक संतापले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. ही चळवळ आक्रमक झाली आणि अखेर नागरिकांची मागणी मान्य झाली. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी दिली. पण आजही मराठी बहुल बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग कर्नाटकमध्ये आहे. तो महाराष्ट्राला जोडलेला नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मूळ मागणी पूर्ण झाली नाही. अखंड महाराष्ट्राचे स्वप्न अपूर्ण राहिले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ

राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. हा निर्णय कळल्यापासून मुंबईकर नाराज होते. मुंबईतील मराठी समाजमन संतापले होते. फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. गर्दी वाढू लागली. कामगार आणि पांढरपेशांचा (व्हाइट कॉलर) मोर्चा निघाला. सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू झाली. फोर्ट परिसरातील जमावबंदी आणि सभाबंदी मोडून नागरिकांनी बंड पुकारले. अनेकांनी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात रस्त्यावर बसून सत्याग्रह सुरू केला. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. लाठीमार झाला तरी गर्दी हटत नाही हे बघून पोलिसांनी गोळीबार केला. मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिसताक्षणी गोळ्या घाला असा आदेश दिला. या आदेशाचे विपरित परिणाम झाले. गोळीबारात १०७ जण हुतात्मा झाले. 

अवघ्या काही मिनिटांत वातावरण बदलले. या घटनेचा परिणाम झाला आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी मिळाली. हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या फ्लोरा फाउंटन येथे राज्याच्या स्थापनेनंतर हुतात्मा चौक बांधण्यात आला आणि त्यावर सर्व हुतात्म्यांची नावं कोरण्यात आली. हुतात्मा स्मारकाची स्थापना १९६५ मध्ये झाली. याआधी १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यामुळेच १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. ज्या १०७ जणांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या हुतात्म्यांना नागरिक आजही नमन करतात. दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेकजण हुतात्मा स्मारकाला भेट देतात आणि हुतात्म्यांना वंदन करतात.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:42 ( 1 year ago) 5 Answer 3155 +22