महार वतन म्हणजे काय?www.marathihelp.com

महार वतन :

जागत्या, वेसकर इ. महारकीच्या कामाचे पोटविभाग असल्यामुळे अनेक ठिकाणी त्यावेळी ही सर्व कामे महार करीत असत आणि तिन्ही प्रतींचे बलुते घेत असत. महार जागले हे पाटील−कुलकर्ण्यांचे हरकामे शिपाई होत. सरकारी कामानिमित्त ज्या इसमाची त्यांना गरज लागते, त्याला बोलावणे; गावात कोणी परकी मनुष्य आला; जनन, मरण किंवा गुन्हा झाला, काळी-पांढरीतली सरकारी मालमत्ता, झाडे, हद्दनिशाण्या यांचा बिघाड झाला किंवा सरकारी जागेवर कोणी अतिक्रमण केले, तर त्याबद्दलची बातमी पाटील−कुलकर्ण्यांना देणे; गाव स्वच्छ ठेवणे; गस्त घालणे; पाटील-कुलकर्ण्यांबरोबर काळी-पांढरीत व परगावाला सरकारी कामानिमित्त जाणे; गावचा वसूल, कागदपत्र व सरकारी सामान ठाण्यात किंवा परगावी पोहोचविणे; पलटणीचा बंदोबस्त, सरकारी अंमलदारांचा सरबराई, गाड्या धरणे वगैरे कामांत पाटील-कुलकर्ण्यांना मदत करणे इ. कामे महार जागले करीत असत. जागले वतन हे अवलच्या महार वतनाचा एक पोटभाग असल्याने अमके काम महाराचे व तमके काम जगल्याचे असा स्पष्ट भेद करता येत नाही; तथापि महार मुलकीकडील व जागले पोलीसकडील नोकर असल्याने वरील कामांपैकी जी मुलकी अंमलदारांकडून चालतात, ती महार करतात व जी पोलीसांकडून चालतात, ती जागले करीत असत. महारांची काठी कोठे अक्षय्य तृतीयेला, तर कोठे भावईच्या अमावस्येला बदलते. महारांना रोख मुशाहिरा नाही. बहुतेक गावी महारांना इनाम जमिनी आहेत, त्यांना ‘हाडकी हाडोळा’ म्हणतात. ज्या गावी महारांना इनाम नाही, त्यांतल्या क्वचित गावांत त्यांना जागल्याप्रमाणे रोख पाच-दहा रूपये सालिना मुशाहिरा सरकार देते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 5724 +22