पुणे जिल्ह्यातील खेड या गावाचे नाव काय ठेवण्यात आले?www.marathihelp.com

खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.

पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय. औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे. या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत. गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत.

पर्यटन स्थळे

भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंडेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत.

शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे.

भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत.


तालुक्यातील गावे :

आडगाव (खेड)
आढे
अहिरे (खेड)
आखारवाडी
आखतुळी
आळंदी ग्रामीण
आंबेठाण
आंभु
आंबोळी (खेड)
अनावळे
अरूदेवाडी
असखेड बुद्रुक
असखेड खुर्द
आवदर
आवंढे (खेड)
आव्हाट

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:40 ( 1 year ago) 5 Answer 3136 +22